महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक ! ७ वर्षांच्या भाचीवर मामाचा अत्याचार, आरोपीला अटक - अल्पावयीन मुलीवर बलात्कार ठाणे

७ वर्षीय भाचीवर ३० वर्षीय सख्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून, पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक केली आहे. विक्रम (३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

७ वर्षांच्या भाचीवर मामाचा अत्याचार
७ वर्षांच्या भाचीवर मामाचा अत्याचार

By

Published : May 1, 2021, 7:24 PM IST

ठाणे -७ वर्षीय भाचीवर ३० वर्षीय सख्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून, पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक केली आहे. विक्रम (३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडितेला बहाण्याने घरात नेऊन अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलगी डोंबिवली पूर्वेतील एका गावात कुटूंबासह राहात असून, तिच्याच शेजारी आरोपी राहतो. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास आरोपीची नजर घराबाहेर खेळत असलेल्या पीडित भाचीवर पडली. यावेळी आरोपी तिला म्हणाला की, 'तुला झोप येत नाही का, चल माझ्या घरात आपण झोप घेऊ' असा बहाणा करत, आरोपी या मुलीला त्याच्या घरात घेऊन गेला, व त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान मुलीला त्रास होऊ लागल्याने मुलीच्या आईने मुलीकडे चौकशी केली असता, मुलीने आईला झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने पीडितेला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठत आरोपीची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून विविध कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आज पाहाटे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

पीडितेचा बापाकडूनही लैंगिक छळ

मामाने पीडित भाचीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, पीडितेचा बापाने देखील लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. यामुळे टिळकनगर पोलिसांनी मुलीच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घृणास्पद घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संपतापाची लाट पसरली असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर. एन. कौराती हे करीत आहेत.

हेही वाचा -रायगडात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा 1 मे मुहूर्त टळला; लस नसल्याने लसीकरण बंद

ABOUT THE AUTHOR

...view details