ठाणे -अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठाण्यात आली आहे. ठाणे जिल्हासत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. अजित काळुराम जुकर (२५ रा. नागांव), असे या आरोपीचे नाव आहे.
हे ही वाचा -सावधान! फेसबुकवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
शुक्रवारी ठाणे जिल्हासत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखीन सहा महिन्यांची कैद अशी सजा ठोठावली आहे. अजित काळुराम जुकर (२५ रा.नागांव) असे अत्याचार प्रकरणी सजा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हे ही वाचा -प्रेम प्रकरणात आडवा येणाऱ्याचा चिरला गळा, प्रियकरासह तिघांना अटक
भिवंडी शहरातील नागांव येथील अजित याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दिले होते. त्यांनतर त्याने १३ जुलै २०१५ पूर्वी वर्षभर तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले होते. तिला पळवून नेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान पीडित मुलीने अजित याच्याकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यास त्याने नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आल्याने तिने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात जावून १७ जुलै २०१५ ला अजितच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अपहरण व बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अजित जुकर याला अटक केली.
हे ही वाचा -संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या
या गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक शितल बामणे व पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी करून सर्व साक्षी पुरावे न्यायालयासमोर सादर करीत दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचा युक्तिवाद ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेऊन या गुन्ह्यात अजित जुकर यास दोषी ठरवले आहे. सात वर्षांची सक्तमजुरी व २५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास अधिकची सहा महिन्यांची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने निकाल जाहीर करताच पोलिसांनी आरोपी अजित जुकर याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
हे ही वाचा -चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चाने दणाणली मुंबई