नवी मुंबई - प्रजासत्ताकदिनी सेक्युलर मंच नवी मुंबईच्या वतीने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात रॅली काढण्यात आली. तुर्भे ते वाशी स्थानकादरम्यान संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबईत एनआरसी, सीएए विरोधात 'संविधान बचाव रॅली' - नवी मुंबई बातमी
धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरविणे, हे पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात आहे. म्हणून नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती रद्द झालीच पाहिजे, असा आग्रह सेक्युलर मंचने धरला.
हेही वाचा - कल्याणामध्ये ३ ठिकाणी आढळले विषारी घोणस, नागरिकांमध्ये भीती
धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरविणे, हे पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात आहे. म्हणून नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती रद्द झालीच पाहिजे, असा आग्रह सेक्युलर मंचने धरला. तसेच महागाई, बेरोजगारीवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. या कायद्यामुळे गरीब, दलित, आदिवासी आणि इतर उपेक्षित समाजघटकांचे नागरिकत्व धोक्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.