अंगीरस रोकडे यांची प्रतिक्रिया ठाणे : रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेनिमित्त ठाण्यातील सुप्रसिद्ध मिठाईचं दुकान प्रशांत कॉर्नरनं नेहमीप्रमाणं अप्रतिम मिठायांचा खजिना ठाणेकरांसाठी आणला आहे. यात आठ पिस असलेली सुवर्ण मिठाई तसेच नारळीपाक, शुद्ध तुपातील घेवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या मिठाईसोबत बहिणींना गिफ्ट देण्यासाठी विविध प्रकारच्या मिठाया देखील उपलब्ध आहेत. ज्यात ग्राहकांच्या पसंतीचे, पदार्थ, ड्रायफ्रूट, जेली पदार्थ देखील उपलब्ध आहेत.
सुवर्ण मिठाई :भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला अजून दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. याच सणाचा आनंद, गोडवा द्विगुणित करण्यासाठी ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाईनं खास रक्षाबंधनासाठी स्पेशल मिठाईची रेंज उपलब्ध केली आहे. दुकानात प्रवेश करताच तब्बल चार हजार रुपये किलो किमतीची सुवर्ण मिठाई सर्वांचे लक्ष वेधून घेते. आकर्षक पेटीमध्ये पॅक केलेली मिठाई ठाणेकरांच्या पसंतीस येत असून अनेक भाऊ आपल्या बहिणींसाठी मिठाई विकत घेताना दिसत आहेत. लाडू, पेढे, बर्फी, गुलाबजाम, हलवा यासारख्या नेहमीच्या मिठायांसोबतच नारळीपाक, नारळाची बर्फी हे दोन विशेष प्रकार यावर्षी विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
विविध प्रांतातील मिठाई उपलब्ध :भारताच्या प्रत्येक प्रांतातील व्यक्तींना आपल्या आवडीची मिठाई मिळावी यासाठी प्रशांत कॉर्नर घेवर मिठाई उपलब्ध करुन दिली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश या भागात घेवर मिठाईला विशेष मागणी असते. त्यामुळे घेवर मिठाई ठाणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. शुद्ध तुपातील घेवर, इतर मिठाया बनविण्यासाठी प्रशांत कॉर्नर यांचं स्वतंत्र किचन आहे, सर्व मिठाया इथेच बनवल्या जातात. तसेच या मिठया खवय्ये ठाणेकरांसाठी माफक दरात उपलब्ध करून दिल्या जातात, असं दुकानाचे व्यवस्थापक अंगीरस रोकडे यांनी सांगितलं. यावर्षीचं आकर्षण म्हणजे स्पेशल ड्रायफ्रूट, नमकीन आणि इतर अनेक वस्तूंनी सजलेलं गिफ्ट हँपर देखील प्रशांत कॉर्नरतर्फे उपलब्ध करून देण्यात आलंय.
प्रत्येक सणांना असते विविध प्रकारची मिठाई :या मिठाईचं वैशिष्ट्य असं आहे की, प्रत्येक सणानुसार या मिठाईमध्ये बदल केला जातो. सणानुसार आवश्यक त्या पद्धतीनं मिठाई बनवली जाते. म्हणूनच ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद या मिठयांसाठी मिळत असतो. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन- नवीन पदार्थ देण्याचा प्रयत्न देखील व्यवस्थापनाकडून केला जातो.
हेही वाचा -Raksha Bandhan Muhurat २०२३ : 'या' मुहूर्तावर करा यंदा रक्षाबंधन; एक तासच आहे वेळ