महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' वक्तव्यावरुन प्रकाश आंबेडकरांविरोधात पोलिसात तक्रार, तत्काळ अटकेची मागणी - prakash ambedkar news

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दारुडे आहे, असे म्हटले होते. या प्रकरणी राजपूत महामोर्चाने घाटकोपर पोलिसांत आंबोडकरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

अजय सिंह सेंगर
अजय सिंह सेंगर

By

Published : Oct 21, 2020, 7:30 PM IST

नवी मुंबई - राजपूत महामोर्चा प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मद्यपी आहेत, असे म्हटले म्हणून पोलिसात राजद्रोहाची तक्रार दाखल करण्यात यावी, अशीही मागणी सेंगर यांनी केली आहे.

राजपूत महामोर्चा प्रमुख अजय सिंह सेंगर

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे दारुडे आहेत, असे म्हटले होते. याप्रकरणी राजपूत महामोर्चाने घाटकोपर पोलिसांत आंबेडकरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यावेळी अजय सिंह सेंगर म्हणाले, भारतीय दंडविधान 500 व 124 (A)नुसार त्यांच्यावर मानहानी व राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, विधिद्वारा स्थापित केंद्र सरकार पंतप्रधानच्या प्रति घृणा व अवमान पैदा करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान याची प्रतिमा मलिन करण्याचा मुद्दाम प्रयत्न केल्याबद्दल झीरो एफआयआर करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली राजद्रोह खपवून घेणार नाही असेही सेंगर यांनी म्हटले आहे.

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पंतप्रधान पदाचा सन्मान राखणे गरजेचे आहे. पंतप्रधान यांचा अपमान म्हणजे राष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान हे, संविधानातील सर्वश्रेष्ठ पद आहे, अनेक देशामध्ये पंतप्रधानवर टीका हा राजद्रोह समजला जातो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी सेंगर यानी केली आहे.

हेही वाचा -डोंबिवली स्थानकात पहिल्याच दिवशी महिलांच्या तिकिटासाठी रांगा

ABOUT THE AUTHOR

...view details