महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टँकरचा धंदा करणारे लोकप्रतिनिधीच पाण्याचा प्रश्न सुटू देत नाहीत - राज ठाकरे - water cup

मराठा समाजाला आरक्षण द्यायचाच नव्हते, मुळात केंद्र सरकारचा विषय असताना राज्य सरकराने त्याची घोषणा केली असा आरोप करताना या महत्वाच्या प्रश्नाचे राजकारण सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे

By

Published : May 13, 2019, 7:55 PM IST

ठाणे - आपण दुष्काळ दौरा करणार नाही, असे स्पष्ट करतानाच दुष्काळात पाणी वाटप करणाऱ्या टँकरच्या लॉबीज कुणाच्या आहेत, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यामागे जर खासदार, आमदार, नगरसेवक असतील तर तो त्यांचा धंदा आहे आणि त्यांच्या धंद्यासाठीच ते नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटू देत नाहीत, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

मनसेच्या वतीने राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील टीप टॉप हाटेलमध्ये झालेल्या या कार्यशाळेदरम्यान सोमवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. जे काम पाणी फाऊंडेशनला जमते ते राज्य सरकरला का जमत नाही? एवढा मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केलेला दाखवला जातो, तो नेमका कुठे जिरतो? नमामी गंगे या प्रकाल्पासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला, त्यातून गंगा साफ करायची होती. मात्र फक्त घाट बांधण्यात आले, असा आरोपही राज यांनी यावेळी केला.

आतंकवादाला धर्म नसतो, सरकार कुणाचेही असो आतंकवाद ठेचायलाच हवा त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी स्वप्ने दाखवली त्यावर ते का बोलत नाहीत? अमित शहा यांनी मोदींची पदवी प्रमाणपत्रे कशाला दाखवली? आम्ही मागितली होती का? आम्हाला सुशिक्षित नव्हे तर चांगला पंतप्रधान हवा होता, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, देशात जे सध्या वातावरण निर्माण केले गेले आहे. त्याविरोधात विचारवंत आणि साहित्यिक यांनी उठाव करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच कोणाचेही सरकार असो ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या विरुद्ध बोलायलाच हवे. नाही तर त्यांना विचारवंत म्हणवून घेण्याचा अधिकार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
तर आरक्षणाची गरजच नाही-
मराठा समाजाला आरक्षण द्यायचाच नव्हते, मुळात केंद्र सरकारचा विषय असताना राज्य सरकराने त्याची घोषणा केली असा आरोप करताना या महत्वाच्या प्रश्नाचे राजकारण सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ते विद्यार्थी मला भेटायला आले तर मी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. मात्र, मुळात खासगी शाळा, महाविद्यालयात आरक्षण लागू नाही, देशातील जवळपास ८५ टक्के उद्योग व्यवसायात आरक्षण लागू नाही. मग नोकऱ्या कशा देणार आहेत? मुळात आजही देशात महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर असून राज्यातील नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरजच लागणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आमच्या मनसैनिकांनी ठाण्यात आंबे चोपले
शेतकऱ्यांना शहरात आपला माल विकण्याचा अधिकार असताना ठाण्यात आंबे विक्रेत्यांना भाजपचा विरोध का ? शेतकऱयांना राजकारणात कशाला ओढता, असे सांगतानाच ठाण्यात आमच्या मनसैनिकांनी आंबे चोपून खाल्ले, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details