मुंबई: 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा घेतला. यात त्यांनी हिंदुत्वासह भोंग्यावर भाष्य केले. त्यांच्या विधानामुळे मनसेचे मुस्लिम कार्यकर्ते नाराज होऊन पक्ष सोडत आहेत. यात अगदी हिंदु कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यामुळे आता आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरेंना दुसरी सभा घेण्याची वेळ आली आहे. यासंदर्भातली 'उत्तर सभा' 12 एप्रिल रोजी ठाण्यात होणार असून या सभेचा टिझर आता मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
करारा जवाब मिलेगा... -मनसेने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणावर शरद पवार, अजित पवार व संजय राऊत यांनी केलेल्या टीका दाखवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांच्या फोटोवर राजनीति या चित्रपटातील मनोज वाजपेयी यांचा करारा जवाब मिलेगा हा डायलॉग यात टाकण्यात आला आहे. सभेत ठाकरे पवार राऊतांना करारा जवाब (Pawar-Raut to get answer) देतील हे यातुन स्पष्ट होत आहे.