महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळीचा आस्वाद - Maharashtra Assembly Elections 2019

भिवंडीतील सभा संपवून परतीच्या वाटेवर असताना राज ठाकरे यांना भूक लागली. मात्र, एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये न जाता त्यांनी आपला मोर्चा ठाण्यातील चवीसाठी नावाजलेल्या मामलेदार मिसळकडे वळवला.

मामलेदार मिसळ खाताना राज ठाकरे

By

Published : Oct 13, 2019, 5:27 AM IST

ठाणे -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे संपूर्ण राज्यात फिरत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी अचानक ठाण्यातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळला भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

राज ठाकरे यांनी शनिवारी अचानक ठाण्यातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळला भेट दिली


भिवंडीतील सभा संपवून परतीच्या वाटेवर असताना राज ठाकरे यांना भूक लागली. मात्र, एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये न जाता त्यांनी आपला मोर्चा ठाण्यातील चवीसाठी नावाजलेल्या मामलेदार मिसळकडे वळवला. खुद्द राज ठाकरे मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्षांनी त्यांना भेटण्यासाठी मामलेदार मिसळ गाठले.

हेही वाचा - हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचाय - शरद पवार


आपापल्या मतदार क्षेत्रात प्रचारात गुंतलेले सर्व उमेदवारांनी देखील राज यांना भेटण्यासाठी मामलेदार मिसळला भेट दिली. अविनाश जाधव, मंगेश कदम, संदीप पाचंगे या सर्व उमेदवारांनी तिथे येवून राज यांची भेट घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details