ठाणे - गेल्या २ दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पावसाच्या हजेरीमुळे काहीसा दिलासा मिळाला. रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जोरदार विजांच्या कडकडाटसह कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथच्या शहरी भागासह मुरबाड, शहरापूर तालुक्याततही आवकाळी पाऊस झाला.
ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी
पावसाने कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागासह मुरबाड, शहापूर तालुक्यातही जोरदार हजेरी लावली.
शनिवार आणि रविवार असे २ दिवस ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाने कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागासह मुरबाड, शहापूर तालुक्यातही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता. पाऊस पडताना विजादेखील चमकत होत्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र, अवकाळी पाऊस असल्याने पुन्हा उकाडा वाढू शकतो, अशी भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे मुरबाड व शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.