ठाणे- गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे शहरात ठिक-ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तसेच पावसामुळे ठाण्यातील श्रीरंग वृंदावन सोसायटीतही पाणी साचले आहे. त्यामुळे वृंदावन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
गणेशोत्सवाला पावसाचा फटका; मंडपामध्ये शिरले पाणी - Thane Rain
2 वर्षापूर्वी पाणी 2 फुटावर आल्यामुळे मंडळाने यंदा 4 ते 5 फूट उंचीवर स्टेज बांधला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी दीड ते 2 फूट पाणी आल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना नाहक त्रास होत आहे.
गणेशोत्सवाला पावसाचा फटका
2 वर्षापूर्वी पाणी 2 फुटावर आल्यामुळे मंडळाने यंदा 4 ते 5 फूटवर स्टेज बांधला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी दीड ते 2 फूट पाणी आल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सदर भागात दरवर्षी पाऊस पडला की पाणी साचते, तरी देखील पालिका प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसल्याची तक्रार स्थानिकांनी आणि मंडळ पदाधिकारी केली आहे.