ठाणे- जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस कोसळणार असल्याची चाहूल लागली होती. आदीच कोरोनाचे सावट त्यातच सायंकाळच्या सुमाराला शहापूर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रसालपाडा, डोळखांब परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार गारांचा पाऊस पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस - Shahapur Rain
शहापूर तालुक्यातील डोळखांब गावासह रसालपाडा परिसरात अवकाळी पावसाने सायंकाळच्या सुमाराला हजेरी लावली. संपूर्ण जग कोरोनाशी लढत, असतानाच अवकाळी पावसामुळे इतर आजार पसरवणारे विषाणू पसरण्याची भीती निर्माण झाल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाल्याच्या पिकांसह काकडीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदीच कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळेही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून भाजीपाल्याच्या पिकांवर संकट कोसळल्याने हातात आलेलं पीक डोळ्यादेखत होत्याच नव्हते झाले आहे.