ठाणे - राज्य शासनाने 15 ऑगस्ट लोकल सेवा चाकरमान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोविडच्या दोन लसी घेतलेल्याना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे. तसेच 15 ऑगस्टच्या दृष्टीनेही कुठला अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मध्य रेल्वे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोहमार्ग पोलिसांनी ठाणे ते कल्याण परिसराच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासाच्या बॅगसह लगेज तपासणी सुरू केली आहे. शिवाय सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा संबंधित गोष्टी तपासल्या जाणार असल्याने गेल्या दोनपासून रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन लोहमार्ग पोलिसांनी सुरू केले. तर गर्दीचा रेटा पाहता अतिरिक्त रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले.
गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीत सर्वाधिक लोकलचे पास वितरित
15 ऑगस्टपासून प्रवास करण्याची राज्य सरकराने परवानगी दिली आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रवाशांनी मास्क घालण्यासह इतरही सर्व नियमांचे पालन केले पाहिजे या देखरेखीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले. तर दीड वर्षाने मुंबईच्या उपनगरीय क्षेत्रातील खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिल्याने प्रवाशी आनंद व्यक्त करीत असून या निर्णयाचे स्वागत करत आहेत. चाकरमानी गेल्या दोन दिवस रेल्वेचा पास मिळावा म्हणून रेल्वे खिडकीवर रांगा लावल्या आहेत. तर ज्यांचे क्यूआर कोड आहेत. अशा प्रवाशांनी कालपर्यत 18 हजारांपेक्षा अधिक लोकल प्रवासाचे पास वितरित करण्यात आले. यामध्ये मध्य रेल्वेच्या मार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थनाकात सर्वाधिक पास काढले तर त्याखालोखाल कल्याण, बदलापूर आणि ठाण्यामध्येही सर्वाधिक पास रेल्वे प्रशासनाकडून वितरित केले आहेत, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालोडे यांनी दिली.
दीड वर्षानंतर रेल्वे स्थानकात गर्दीचा रेटा उसळणार