ठाणे- मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वीच संध्याकाळी पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील पुलाच्या खालील भागाचे सिमेंटचे प्लास्टर पडले. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी अभियंत्यांची एक टीम मध्यरात्री पाठवून त्या पुलाची पाहणी करत तिथे तात्पुरते प्लास्टर केले. मात्र, याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. आज येथे गेल्यानंतर या पुलाची अवस्था खूपच वाईट असल्याचे दिसून आले.
कोपरी पूल प्रकरणात रेल्वेचा हलगर्जीपणा; कोट्यवधींचा खर्च गेला शेकडो कोटींवर - प्रवासी
अनेक ठिकाणी कोपरी पुलाचे सिमेंटचे प्लास्टर पडले आहे. तर काही ठिकाणी आतल्या लोखंडी सळ्या दिसत असून त्यांना गंज लागल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा पूल पूर्णतः सुरक्षित आहे. मात्र, मागील इतिहास पाहता यावर किती विश्वास ठेवता येईल, अशी शंका येत आहे. एमएमआरडीए या ठिकाणी पुलाची पुनर्निर्मिती करणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा का असा प्रश्न निर्माण होत आहे.
अनेक ठिकाणी या पुलाचे सिमेंटचे प्लास्टर पडले आहे. तर काही ठिकाणी आतल्या लोखंडी सळ्या दिसत असून त्यांना गंज लागल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा पूल पूर्णतः सुरक्षित आहे. मात्र, मागील इतिहास पाहता यावर किती विश्वास ठेवता येईल, अशी शंका येत आहे. एमएमआरडीए या ठिकाणी पुलाची पुनर्निर्मिती करणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असूनही रेल्वेच्या लालफितीच्या कारभारामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. २००४ साली १३ कोटी रुपयांचे खर्च अपेक्षित असताना तेव्हा काम न केल्यामुळे आज हा खर्च २५० कोटींपर्यंत गेलेला आहे. या पुलावरील वाहतूक तातडीने बंद व्हावा, असा आदेश २०१५ साली आयआयटीने दिले होते. मात्र, त्याच्याकडेही रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे. या पुलाचा अपघात झाल्यास इस्टर्न एकस्प्रेस हायवे आणि मध्य रेल्वेची पूर्ण वाहतूक विस्कळीत होणार आहे. आता भूमिपूजन होऊनही ६ महिने झाले, तरीही सुस्त गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी, अशी ठाणेकरांची अपेक्षा आहे.