ठाणेRaid On Cricket Match Betting: सुमित नवीन मोटवाणी, दिनेश मुरलीधर रोहरा, भारत मोहन राजपाल, नरेश साजनदास रोहरा असे गुन्हा दाखल झालेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरात महादेव केबल नेट इन्टरप्राइजेस नावाने कार्यालय आहे. या कार्यालयात लपून छपून काही बुकी वर्ल्डकप इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर ३ नोव्हेंबर रोजी पोलीस पथकाने या ठिकाणी अचानक धाड टाकली. यावेळी पाच जण क्रिकेट मॅचवर एका वेबसाईटद्वारे मोबाईलवरून इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांच्या सामन्यावर सट्टा घेताना आढळून आले. (Cricket Betting Thane)
सट्टेबाजांवरील यावर्षीची प्रथम कारवाई:पोलीस पथकाने धाडी दरम्यान घटनास्थळावरून अनेक मोबाईल, दोन लॅपटॉप, डायरी, टीव्ही तसेच ३८ हजार ३०० रुपये रोख रक्कमेसह १ लाख ४२ हजार ९०० रुपयांचे सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी मध्यवती पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार धनंजय ठोमर यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४२०, ३४ सह जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यावर्षी वर्ल्डकप क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर प्रथमच ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे अधिक तपास करत आहेत.