महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray Taunt BJP : कर्नाटक निवडणुकीत 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम; राज ठाकरेंचा भाजपला टोला - राज ठाकरेंचा भाजपला टोला

कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम झाल्याने कॉंग्रेस पक्षाला विजयी मिळाला. त्यामुळे कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचा पराभव हा स्वभावाचा आणि त्यांच्या वागणुकीचा पराभव असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला आज (रविवारी) लगावला आहे.

Raj Thackeray Taunt BJP:
राज ठाकरेंचा भाजपला टोला

By

Published : May 14, 2023, 3:32 PM IST

कर्नाटक निडणुकीतील कॉंग्रेस विजयावर राज ठाकरेंचे मत

ठाणे: राज ठाकरे हे 'मनसे'च्या संघटन बांधणीसाठी ठाणे जिल्ह्यातील मनसैनिकांचे मेळावे घेऊन त्यांचे मत जाऊन घेत आहेत. आज ठाणे जिल्ह्यातील दौऱ्याचा तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी अंबरनाथमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मिळलेल्या विजयानंतर भाजपवर टीका केली.

सत्ताधारी हा हरत असतो:राज ठाकरे पुढे म्हणाले कि, आपले कोण वाकडे करू शकतो असा जो विचार असतो त्याचा हा पराभव असल्याचे सांगत भाजप नेत्यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. शिवाय कर्नाटक निवडणुकीचा निकाल पाहता जनतेला कधी गृहीत धरू नये याचा सर्वांनीच बोध घेण्याची गरज आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा. विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो का? अन् सत्ताधारी हा हरत असतो का? असा सवालही त्यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर उपस्थित केला.

'मनसे'त यापुढे गटबाजी नसणार:ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागसह उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर या भागातील मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याने त्याचा फटका 'मनसे'ला निवडणुकीत बसत आहे. या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, यापुढे मनसेत गटबाजी दिसणार नाही. तर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधकांची मोट बांधली आहे. त्यामध्ये आगामी काळात 'मविआ'ला मनसेची साथ मिळेल का? या प्रश्नावर राज ठाकरेंनी हसून बोलणे टाळले.


ठाण्यात 'मनेसे'चे शक्ती प्रदर्शन:राज ठाकरे यांचा शुक्रवारपासून ठाणे आणि पालघर जिल्हा दौरा सुरू झाला असून आज दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत राज ठाकरे हे मिरा-भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहर असा दौरा आयोजित केला. आज अंबरनाथ व बदलापूर दौऱ्यावेळी 'मनसे' पक्ष कार्यालयांचे उद्घाटन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका, पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम, पत्रकार आणि प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटीगाठी अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने 'मनसे'कडून ठाणे जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातील हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा:

  1. DRDO Honey Trap: कुरुलकरने हनी ट्रॅपमध्ये अडकून महिलेसोबत पाहिली मॅच अन् विदेशातील डान्स बारमध्ये लुटली मजा
  2. Pune Murder Case : किशोर आवारे खून प्रकरणाला लागले वेगळे वळण, माजी नगरसेवक पुत्राने वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला
  3. Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक; शरद पवारांच्या निवासस्थानी ठरणार रणनीती

ABOUT THE AUTHOR

...view details