पुणे :महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठ परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस स्टेशनच्या जवळ एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला.
एकतर्फी प्रेमातून केला हल्ला :प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२) रा. मुळशी डोंगरगाव असे या आरोपीचे नाव आहे. सुदैवाने दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला पकडले आणि मुलीचा जीव वाचवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गर्दीच्या ठिकाणी अश्या पद्धतीची घटना घडत आहे. कोणीच मध्ये पडले नाही. त्यात जेव्हा त्या तरुणाला पकडुन आणले, तेव्हा पेरूगेट पोलीस स्टेशन येथे पोलीस देखील नव्हते. त्या तरुणांनी पोलिसांना बोलावून त्या तरुणाला ताब्यात दिले आहे.