महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर पावत्यांची मनसेने केली होळी - मालमत्ता कर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात कचरा उचलण्याचा कंत्राट कोणार्क कंपनीला दिले असून प्रतिदिन 4 लाख 25 हजार रुपये दिला जातो. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारीदेखील या कंपनीची असून ती त्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर पावत्यांची मनसेने केली होळी

By

Published : May 29, 2019, 10:22 AM IST

ठाणे- उल्हासनगरमध्ये घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, कचऱ्यावर प्रक्रिया नसून डंपिंगची समस्या आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना केलेली भरमसाठ मालमत्ता करवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयासमोर मालमत्ता कराच्या पावत्यांची होळी केली. यावेळी प्रशासनाच्यविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर पावत्यांची मनसेने केली होळी

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात कचरा उचलण्याचा कंत्राट कोणार्क कंपनीला दिले असून प्रतिदिन 4 लाख 25 हजार रुपये दिला जातो. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारीदेखील या कंपनीची असून ती त्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या कंपनीविरुद्ध प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी मालमत्ता करामध्ये भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. जोपर्यंत ही कंपनी कचऱ्याची नीट विल्हेवाट लावत नाही, तोपर्यंत मालमत्ताकर वसूल करू नये, अशी मागणी मनसेने केली आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना १२ कोटी ९० लाख अतिरिक्त वसुली युजर टॅक्सच्या नावाने होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मंगळवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हाअध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा अध्यक्ष प्रदिप गोडसे, मनविसेचे शहरअध्यक्ष मनोज शेलार, शहर संघटक मैनुऊद्दीन शेख, उपशहर अध्यक्ष सुभाष हटकर, शैलेश पांडव, शहर सचिव शालिग्राम सोनवणे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी मालमत्ता कर पावत्यांची जाळून होळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details