नवी मुंबई - राज्यात कडक लॉकडाऊन लागला असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही प्रवास करण्याची मुभा देण्यात आली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांतर्फे मुंबईतून नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असून वाशी टोल नाक्यावर उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्फत वाहनांची चौकशी करूनच वाहन सोडण्यात येत आहेत.
नवी मुंबईत ई-पास शिवाय गाड्यांना प्रवेश प्रतिबंधित :
नवी मुंबई किंवा मुंबई शहरातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने नवी मुंबईत आता आठ ठिकाणी टोलनाक्यावर सर्वच वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
नवी मुंबईत ई-पास शिवाय खासगी गाड्यांना प्रवेश प्रतिबंधित.. पास नसतानाही प्रवास करणाऱ्याना पाठवताहेत घरी - अनावश्यक व ई-पास नसताना प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा घरी पाठविण्यात येत असून, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतून नवी मुंबईत प्रवेश करायचा असल्यास आता ई -पास बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईचा बडगा उचलण्यात येईल अशी प्रतिक्रिया उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. हेही वाचा -ऑक्सिजनकरता धावाधाव : भारत १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची करणार आयात