नवी मुंबई - सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली येथे खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला आहे. तर इतर ६ जण जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही प्रवासी बस कर्नाटकवरुन मुंबईकडे जात असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटकातून प्रवासी घेऊन आलेल्या खासगी बसचा कळंबोलीत अपघात, एक गंभीर - कर्नाटक
खासगी प्रवासी बसचा कळंबोली येथे भीषण अपघात झाला. या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला आहे. तर इतर ६ जण जखमी आहेत.
अपघातात चक्काचूर झालेली खासगी बस
कर्नाटकवरून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसने महामार्गावर बंद पडलेल्या बसला जोरदार धडक दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंद पडलेल्या बसचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. दरम्यान जखमींना नजकीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये 7 जण होते. यातील 1 जण गंभीर जखमी आहे. या अपघाताचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.