ठाणे - कोरोनाच्या रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांच्या घरी सोडताना सोसायटीमधील नागरिकांद्वारे होणाऱ्या धक्काबुक्कीमुळे काही रुग्णवाहिका चालक-मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे धक्काबुक्की-मारहाणीचा प्रकार होत असल्याने भातीपोटी काही खासगी रुग्णवाहिका चालक ही सुविधा बंद करण्याच्या तयारित असल्याचे चित्र आहे.
कोरोना : खासगी रुग्णवाहिका चालक-मालक भीतीपोटी व्यवसाय बंद करण्याच्या तयारित, मारहाणीमुळे नाराजी
ठाण्यातील एका विभागातून दुसऱ्या विभागात जात असताना देखील रुग्णांना घेऊन गेल्यानंतर परत त्याच विभागात येण्यास रुग्णवाहिका चालकांना मज्जाव करण्यात येत आहे.
कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने त्यांच्या सोसोयटीमध्ये सोडताना धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही खासगी रुग्णवाहिका चालक-मालकांवर भीतीपोटी सुविधा बंद करण्याची वेळ आली आहे. तर, मुंब्रा येथे सोसायटी रुग्णवाहिकेला परत पाठवत आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे रुग्णवाहिका चालक सांगत आहेत.
ठाण्यातील एका विभागातून दुसऱ्या विभागात जात असताना देखील रुग्णांना घेऊन गेल्यानंतर परत त्याच विभागात येण्यास रुग्णवाहिका चालकांना मज्जाव करण्यात येत आहे. खासगी रुग्णवाहिका चालक रुग्णांना सेवा देत असतात. परंतु, त्यांच्याकडे कोरोनाचे रुग्ण हाताळण्यासाठी महागडे किटदेखील नसल्याचे चालकांमांध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच त्यांना किंवा त्यांच्या कामगारांना मारहाणदेखील होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.