महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PM Modi-Thane Railway line : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ठाणे आणि दिवा रेल्वे मार्गाचे उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे रेल्वेस्थानक

ठाणे ते दिवा दरम्यान 5 आणि 6 व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ स्क्रिनिंग मार्फत होणार आहे.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

By

Published : Feb 18, 2022, 10:02 AM IST

Updated : Feb 18, 2022, 10:41 AM IST

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवार) दुपारी 4:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवी झेंडी दाखवणार आहेत. यावेळी ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

ठाणे ते दिवा दरम्यान 5 आणि 6 व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ स्क्रिनिंग मार्फत होणार आहे. या कार्यक्रकासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह विविध नेते मंडळींना उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा -Kirit Somaiya Visiting Korlai Alibag : कोर्लईला भेट देऊन सत्य समोर आणणार - किरीट सोमैया

दीड दशकांचा प्रवास

1. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनच्या कामास सन २००८ मध्ये रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव असताना २८७ कोटी ला मंजुरी मिळवली होती.
2. सन २०११ मध्ये याचे काम सुरु झाले.
3. सन २०१७ साली या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन झाले.
4. सन २०१९ मध्ये रेतीबंदर या भागात ब्रिज उभारण्यासाठी पर्यावरण खात्याची आवश्यक असलेली मंजुरी मिळाली.
5. या कामाला गती मिळत नसल्याने हे काम अतिशय संत गतीने सुरु होते. अखेरीस या प्रकल्पाची रक्कम ६२० कोटी पर्यंत गेली.
6. ४ वर्षापूर्वी दिवा रेल्वे स्थानकादरम्यान भावेश नकाते या तरुणास गर्दीमुळे जीव आपला गमवावा लागला.
7. त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक एस के सूद यांच्यासोबत सर्व खासदारांची कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या झालेल्या बैठकीत खासदार राजन विचारे व श्रीकांत शिंदे यांनी या मध्य रेल्वे मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे फेऱ्यात वाढ करण्याचा मुद्दा धरून धरला होता. त्यावेळी पाचव्या व सहाव्या लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. खऱ्या अर्थाने आज या कामाला गती मिळाल्याने हे काम पूर्ण झाले. या नवीन पाचव्या व सहाव्या लाईनमुळे नवीन मार्गिका तयार झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्या यांना दोन वेगवेगळे मार्ग तयार झाल्याने सिग्नलसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच होणारे अपघात टळू शकणार आहेत.

Last Updated : Feb 18, 2022, 10:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details