ठाणे- यशोधननगर येथील संकल्प इंग्लिश स्कूल आणि अखिल भारतीय कला, क्रीडा, व सांस्कृतिक अकादमीतर्फे ८५ तास अखंड कविता वाचन करण्यात येणार आहे. या कर्यक्रमाचे उद्घाटन डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ८५ तास चालणाऱ्या कविता वाचनात महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी आले आहेत.
ठाण्यात ८५ तास १००० कवी सादर करणार स्वतःच्या कविता
८५ तास चालणाऱ्या कविता वाचनात महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी आले आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजया वाड, शशिकांत तिरोडकर यावेळी उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजया वाड, शशिकांत तिरोडकर यावेळी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ख.र.माळवे हे होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजया वाड यांनी शाळेला सुट्टी पडली, ही कविता सादर केली. तसेच शशिकांत तिरोडकर आणि उपस्थित कवींनी स्वतःच्या कविता सादर करून कार्यक्रमाला रंगात आणली.
या कविता वाचनात प्रामुख्याने डॉक्टर, पोलीस, विद्यार्थी, विकलांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी रचलेल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या जाणार आहेत.