महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; एटीव्हीएम मशीन देखभालीचे काम सुरू - रेल्वे प्रवाशांना मुंबई परिसरातील उपनगरीय रेल्वे सेवा

सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तिकीटासाठी गर्दी होण्याची शक्यता बघता, बंद असलेल्या एटीव्हीएम मशीनची दुरुस्ती आणि अद्ययावत ठेवण्याचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले.

ठाणे
ठाणे

By

Published : Jan 31, 2021, 6:56 PM IST

ठाणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदीमध्ये सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना मुंबई परिसरातील उपनगरीय रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यांनतर 'अनलॉक' काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा असल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर निवडक तिकीट खिडक्या सुरू होत्या. तर रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीन गेल्या 10 महिन्यांपासून बंद होत्या. आता उद्यापासून मात्र सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तिकीटासाठी गर्दी होण्याची शक्यता बघता, बंद असलेल्या एटीव्हीएम मशीनचे दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणाचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले. कल्याण रेल्वे स्थानकावरील 32 एटीव्हीएम मशीन असून या मशीन साफसफाईसह इतर देखभालीची कामे सुरू करण्यात आली. उद्या पहाटेपासून या सर्व मशीन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

ठाणे
पुन्हा रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजणार..
टाळेबंदी पूर्वी मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा, कर्जत मार्गावर ४० लाख प्रवासी लोकलने प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन रोजगार मिळवीत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात उपनगरीय गाड्या बंद ठेवल्याने त्याचा थेट परिणाम खासगी क्षेत्रातील लहान आस्थापनांसह लघु उद्योगांवर झाला होता. त्यांनतर मात्र अनलॉक काळात लोकल सेवा अतिआवश्यक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली. त्यामुळे लोकल प्रवाशांची संख्या मध्यरेल्वेच्या उपनगरीय मार्गावर ७० टक्क्याने घट होऊन प्रवासाची मुभा मिळलेल्या ३० टक्केच प्रवाशाना याचा लाभ होऊन कल्याण रेल्वे जक्शन मधून ७० हजार प्रवासी लोकलने प्रवास करीत आहेत. मात्र कॉलडाऊनपूर्वी हीच संख्या अडीच लाखांच्या आसपास होती. मात्र उद्यापासून पुन्हा लाखो चाकरमानी प्रवास करण्यासाठी लगबगिने स्थानक गाठून कामाच्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे स्थनाकात होणारी प्रवाशांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोहमार्ग पोलीसांचे पथके मोठ्या प्रमाणात स्थानकात गस्त घाण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details