महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP Loksabha Election : ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची तयारी सुरू; 'या' नावांची चर्चा - माजी खासदार संजीव नाईक

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून तीन नावांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह आमदार संजय केळकर आणि भाजप थिंक टँकचा एक प्रमुख चेहरा विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.

BJP Loksabha Election Preparation
BJP Loksabha Election Preparation

By

Published : Jul 29, 2023, 11:01 PM IST

ठाणे:ठाण्यात भाजपचा वाढता प्रभाव पाहता येथे आता भाजपने चाचपणी सुरू केली आहे. कल्याण मतदार संघावरील आपली दावेदारी सोडताना भाजपकडून ठाण्यामध्ये तीन उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह आमदार संजय केळकर आणि भाजप थिंक टँकचा एक प्रमुख चेहरा विनय सहस्त्रबुद्धे यांच्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


ठाणे:येथील लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नेमणूक झाली. तेव्हाच अनेक राजकीय भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कल्याण लोकसभा मतदार संघासाठी आग्रही असलेल्या भाजप पक्षाने हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडला. अशी चर्चा सुरू असताना भाजपने आता ठाणे लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सहा भाजप नेत्यांवर सोपविण्यात आलेली आहे.

विनय सहस्रबुद्धेंचे नाव या कारणाने चर्चेत:ठाणे लोकसभा मतदारसंघावर सर्वांत मोठी दावेदारी असलेले संजीव नाईक यांना मात्र कल्याण मतदारसंघाची जबाबदारी दिल्याने त्यांचा पत्ता आपोआप कट केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. संजीव नाईक हे एक मातब्बर नेते असून ठाणे लोकसभा मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. तरी देखील त्यांना असे डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर सध्या चर्चेत असलेले विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपच्या थिंक टॅंक मधील एक प्रमुख नेते आहे. त्यांचे नाव चर्चेत आल्याने या मतदार संघातील रंगत वाढली आहे. विनय सहस्रबुद्धे हे अत्यंत अनुभवी आणि संवेदनशील नेते आहे. याच कारणाने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेऊ शकतील, असा अंदाज आल्यानेच त्यांचे नाव चर्चेत आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.


श्रीकांत शिंदे यांची होणार अडचण:दुसरीकडे जर ठाण्याची जागा भाजपने मागितली तर श्रीकांत शिंदे यांची मोठी अडचण होणार आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये ती जागा भाजपने मागितली असून श्रीकांत शिंदे ठाण्यातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळेस भाजपने ठाण्याची देखील जागा मागितली तर श्रीकांत शिंदे यांची मोठी अडचण होणार आहे.

हेही वाचा:

  1. Nana Patole on Opposition Leader : पुढच्या आठवड्यात ठरणार काँग्रेसचा विरोधी पक्षनेता - नाना पटोले
  2. Uddhav Thackeray : एक-एक फोडण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
  3. Ramdas Athawale : 'तुम्ही कधीही आमच्यासोबत येऊ शकता', आठवलेंची नितीश कुमारांना थेट ऑफर

ABOUT THE AUTHOR

...view details