ठाणे- वांगणीजवळ पुराच्या पाण्यात तब्बल 15 तास अडकलेल्या मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एक 9 महिन्यांची गर्भवती महिलाही अडकली होती. गाडीतच या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या आणि तिच्या नातेवाईकांची एकच धांदल उडाली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 'त्या' गर्भवती महिलेला केले रुग्णालयात दाखल - प्रसुतीवेदना
मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 'त्या' गर्भवती महिलेला केलं रूग्णालयात दाखल
त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना त्यांना सुखरूपपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेश्मा यांच्याप्रमाणेच या एक्स्प्रेसमधून आणखीही 8 गर्भवती महिला प्रवास करत होत्या. त्यांनाही मदतीसाठी बराचवेळ धडपड करावी लागली व मोठा मनस्तापही सहन करावा लागला, अशी माहिती आहे.
दरम्यान, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, नौदल आणि एनडीआरएफने यशस्वी मोहीम राबवत गाडीतील सर्व 700 प्रवाशांची सुखरूपपणे सुटका केली आहे. जवळपास ३ ते ५ फूट पाण्यात ही एक्स्प्रेस अडकली होती.