महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांची चौकशी करा; सरनाईक यांचे लाचलुचपत विभागाला पत्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजपा नगरसेवक संजय वाघुले यांची चौकशी करा, या मागणीचे पत्र ठाणे लाचलुचपत विभागाला दिले आहे.

Pratap Sarnaik on Kirit Somaiya and  Sanjay Waghule
किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांची चौकशी करा; सरनाईक यांचे लाचलुचपत विभागाला पत्र

By

Published : Dec 18, 2020, 12:50 AM IST

ठाणे - ठाण्यात होल्टस कंपनीच्या भूखंडावर आणि शेठ ग्रुप बिल्डरच्या वाहनतळावर ३६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कोविड सेंटर उभारणीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजपा नगरसेवक संजय वाघुले यांनी करत या कामांवर आक्षेप नोंदवला होता. यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत, किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याचे सांगितले. यानंतर आता सरनाईक यांनी, सोमय्या आणि वाघुले यांची चौकशी करा, या मागणीचे पत्र ठाणे लाचलुचपत विभागाला दिले आहेत. यामुळे ठाण्यात कोविड सेंटरवरून शिवसेना आमदार आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोपांचे 'वॉर' सुरु झाले आहे.

ठाण्यातील शेठ ग्रुपच्या वाहन तळावर जे दोन कोविड सेंटर उभारले जात आहेत. त्यापैकी व्होल्टास कंपनीच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटर बाबत संजय वाघुले यांनी आक्षेप घेतलेला आहे. प्रताप सरनाईक यांच्या आग्रहास्तव कोविड सेंटरचे काम चालू असल्याचा आरोप माजी खासदार सोमय्या आणि भाजपा नगरसेवक वाघुले यांनी केला होता. यावर सदर कोविड सेंटर हे राज्य शासनाने दिलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात येत असल्याचा खुलासा शिवसेना प्रताप सरनाईक यांनी केला.

व्होल्टास कंपनीच्या जागेवरील कोविड सेंटरचा खर्च अंदाजे १३ कोटी व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटरचा खर्च २३ कोटीचा खर्च होणार असल्याची महापालिकेची माहिती आहे. आरोप करणारे संजय वाघुले ज्या ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. त्याच पालिकेच्या महासभेत आणि स्थायी समितीत दोन्ही विषयांना मंजुरी दिलेली असल्याचा उल्लेख आमदार प्रताप सरनाईक यांनी निवेदनात केला आहे. तर नगरसेवक संजय वाघुले यांनी खोपट येथील हायवे जवळ असलेल्या देवकार्पोरा इमारतीमधील शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटरच्या कार्यालयातील कन्सलन्ट सोबत त्यांची बैठक झाल्याची माहिती सरनाईक यांनी देत त्याचे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा तक्रारी सोबत दिले आहे. आता या प्रकरणी सरनाईक यांनी माजी खासदार किरीट सोमय्या व नगरसेवक संजय वाघुले या दोघांचीही चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र ठाणे लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक महेश पाटील यांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details