महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SPECIAL : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील देवदुतांचे पथक वाऱ्यावर, बचाव साहित्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष - प्रदीप गायकर बचाव पथक ठाणे

शहापूर तालुक्यात वाशिंद ग्रामपंचायत हद्दीतील ( Pradeep Gaikar rescue team Washind ) रेस्क्यू टीमने शेकडो लोकांचे प्राण वाचवले. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून शासन दरबारी रेस्क्यूसाठी ( life saving equipment Demand by Pradeep Gaikar ) लागणाऱ्या साहित्यांची वारंवार मागणी करूनही टीमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे, अनाथांचा नाथ म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात देवदुतांची टीमच वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे.

Pradeep Gaikar rescue team Washind
प्रदीप गायकर बचाव पथक ठाणे

By

Published : Jul 23, 2022, 8:48 AM IST

ठाणे - शहापूर तालुक्यात वाशिंद ग्रामपंचायत हद्दीतील ( Pradeep Gaikar rescue team Washind ) रेस्क्यू टीमने रेस्क्यूसाठी लागणाऱ्या साहित्याविनाच जिवाची बाजी लावून आतापर्यत शेकडो नागरिकांचे पाण्यात बुडताना प्राण वाचवले. जिल्हा प्रशासनाकडून १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला टीमच्या प्रमुखांचा सत्कार करून केवळ प्रशिस्तपत्र दिले जाते. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून शासन दरबारी रेस्क्यूसाठी ( life saving equipment Demand by Pradeep Gaikar ) लागणाऱ्या साहित्यांची वारंवार मागणी करूनही टीमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे, अनाथांचा नाथ म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात देवदुतांची टीमच वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे.

माहिती देताना रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप गायकर

हेही वाचा -No cemetery at Lingayatpada : इथं स्मशानभूमीच नाही; मृतदेहावर ताडपत्री पकडून करतात अंत्यसंस्कार

शहापूर तालुक्यातील निर्सगाच्या सानिध्यात अनेक डोंगर, तलाव, धबधबे आहेत. शिवाय भातसा व वैतरणा नद्या वाहत आहेत. मात्र, पावसाळ्यात नदी लगतच्या गावांना पुराचा फटका बसून पुराच्या पाण्यात वाहून अनेकांचे जीव गेले. तर काही पर्यटकांचा धबधबे असलेल्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे, वाशिंद ग्रामपंचायत हद्दीत रहाणारे प्रदीप गायकर यांनी नागरिकांचे प्राण वाचविण्याचा निर्णय घेऊन आसपास गावपाड्यातील तरुणांना एकत्र करून एक रेस्क्यू टीमची स्थापना करून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडूनही प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या ५ वर्षांत १२० ते १३० नागरिकांना पुराच्या पाण्यात बुडताना त्यांचे प्राण वाचवले. तर आतापर्यंत ४० ते ५० पाण्यात बुडालेल्या नागरिकांच्या मृतदेहाचा शोध घेऊन त्यांना नदी पात्रातून बाहेर काढले.

प्रशस्तीपत्र

या साहित्यांची केली मागणी - बचावकार्य करत असताना रेस्क्यूसाठी लागणारे लाईफ जॅकेट, बोट, इंजिन आणि इतर साहित्यांविनाच जिवाची बाजू लावून माणूसकीच्या नात्याने नागरिकांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, गेल्या ४ वर्षांपासून पावसाळ्यात पुराच्या प्रवाहात रेस्क्यूसाठी इंजिन, सहा सीटर बोट, तसेच, लाईफ जॅकेट आणि इतर साहित्य मिळावे म्हणून प्रदीप गायकर व त्यांचे सहकारी लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायत ते जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करत आहे. मात्र, त्यांच्या मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे, टीमच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप गायकर यांनी गेल्याच आठवड्यात एका ३९ वर्षीय महिलेच्या बचाव कार्याची घटना सांगितली. ते म्हणाले की, सुदैवाने त्या महिलेला नदीच्या मध्यभागी एक खडक मिळाला जो त्यांनी दोन्ही हाताने धरला होता. त्यानंतर आमच्या टीमने त्यांना नदी पात्रातून परत आणण्यासाठी त्यांच्यापर्यंत जिवाची बाजी लावली. मात्र, नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे हे जिकरीचे काम होते. अशा वेळी अनेकदा लोकांचा श्वास सुटतो आणि थकवा येतो. दोरीच्या सहाय्याने त्यांना लाईफ जॅकेट घातले. त्यानंतर पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आणले. त्यामुळे, त्या महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.

प्राण वाचवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्या - प्रदिप गायकर यांनी सांगितले की, गावात आमची स्वतःची रेस्क्यू टीम तयार केली आहे. या टीममध्ये १२ वर्षांच्या मुलांपासून ते ६० वर्षीय गावकऱ्यांचा समावेश आहे. गाव नदीला लागून असल्याने बहुतेक वेळा पावसाळ्यात नदी भागात पूर परिस्थितीत पाण्यात व्यक्ती बुडतात. त्यावेळी आम्ही जिल्हा रेस्क्यू टीमला कॉल करतो. मात्र, त्यांचे ठिकाण खूप दूर असल्याने त्यांना पोहचायला वेळ लागतो. मात्र, तोपर्यंत पाण्यात बुडत असलेल्या त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे, आम्ही जिल्हा आपत्ती पथकाच्या मदतीने प्रशिक्षण घेतले. नंतर हे प्रशिक्षण लहान मुलांसह इतर गावकऱ्यांना दिले जेणेकरून ताबडतोब पाण्यात जाऊन लोकांचे प्राण वाचवता येईल. मात्र, आमच्या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा -Girl died in truck accident : झोपडीवर उलटला ट्रक, टेडी बियर विकणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details