ठाणे -आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने किरण गोसावी विरोधात धक्कादायक माहिती दिल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. प्रभाकर साईल, किरण गोसावी गेल्या वर्षभरापासून राहत असलेल्या आणि प्रभाकर याने पोलिसांना दिलेल्या सत्य प्रतिज्ञा पत्रात उल्लेख केलेल्या घोडबंदर रोडवरील वाघबील येथील आधार सोसायटी याठिकाणी ५० लाख दिल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मात्र याठिकाणी आढावा घेत असतांना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'या' सोसायटीत राहायला होते किरण गोसावी आणि प्रभाकर साईल - किरण गोसावी
प्रभाकर साईल, किरण गोसावी गेल्या वर्षभरापासून राहत असलेल्या आणि प्रभाकर याने पोलिसांना दिलेल्या सत्य प्रतिज्ञा पत्रात उल्लेख केलेल्या घोडबंदर रोडवरील वाघबील येथील आधार सोसायटी याठिकाणी ५० लाख दिल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मात्र याठिकाणी आढावा घेत असतांना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
किरण गोसावी याठिकाणी त्याच्या एका बॉडीगार्ड आणि एका तरुणी सोबत राहत होता. दिवसा तो बाहेर निघायचा मात्र रात्री कधी यायचा याची माहिती कोणालाच राहत नव्हती. तसेच तो ज्या भाड्याच्या गाडीत नेहमी फिरायचा त्याच्या गाडीत पोलीस लिहलेली पाटी असायची. तो नेहमी हातात एक डायरी, सिगारेटची पाकीट घेऊन निघायचा. गणपती नंतर तो याठिकानाहून दुसरीकडे राहण्यास गेला आणि आता याच इमारतीत पुणे पोलीस देखील किरण गोसावीची माहिती काढण्यासाठी आले असल्याची माहिती या इमारतीच्या सुरक्षा राक्षकाने दिली आहे. जर किरण गोसावी याचा पोलिसांनी योग्य तपास केला तर अनेक फसवणुकीचे आणि खंडणीचे प्रकार समोर येऊ शकतात. किरणची अनेक मुलींसोबत मैत्री होती. त्याचाच फायदा घेत किरण खंडणीही गोळा करत असल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली आहे.
हेही वाचा -समीर वानखडे तातडीने दिल्लीला जाणार; खंडणी प्रकरण संदर्भात दिल्लीत बोलवले