महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 7, 2020, 5:20 PM IST

ETV Bharat / state

वीज चोरी प्रकरणी पॉवरलूम मालकाला 5 लाखांच्या दंडाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय

भिवंडीत पॉवरलूम चालविणाऱ्या अन्सारी याच्या कारखान्यात 30 पॉवरलूम मशीन, 2 कांडी मशीन आणि 15 ट्युबलाईटद्वारे विजेचा वापर होत होता. त्याचे 9 लाख 22 हजारांचे विजेचे बील थकीत असल्याने विद्युत कंपनीने लूमचा वीजपुरवठा खंडित करून वीजमीटर काढून नेले. असे असले तरी अन्सारी याने लूमसाठी बेकायदेशीर विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेतला होता.

thane
वीज चोरी प्रकरणी पॉवरलूम मालकाला 5 लाखांच्या दंडाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय

ठाणे - वीज बील थकवल्याप्रकरणी भिवंडीतील एका पॉवरलूमचा विद्युत मीटर महावितरणने काढून नेला होता. याप्रकरणी पॉवरलूम चालविणाऱ्या मालकाने चोरून वीज वापरल्याने ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दोषी ठरवत मालक गुफरान अहमद इलियास अन्सारी (वय 45) याला 5 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाच्या रकमेतून चोरून वापरलेल्या 4800 युनिट विजेची रक्कम 1 लाख 44 हजार महावितरणला देण्याचेही निकालात नमूद केले आहे. या खटल्यात सरकारी वकील विवेक कडू यांनी युक्तिवाद केला.

वीज चोरी प्रकरणी पॉवरलूम मालकाला 5 लाखांच्या दंडाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय

भिवंडीत पॉवरलूम चालविणाऱ्या अन्सारी याच्या कारखान्यात 30 पॉवरलूम मशीन, 2 कांडी मशीन आणि 15 ट्युबलाईटद्वारे विजेचा वापर होत होता. त्याचे 9 लाख 22 हजाराचे विजेचे बिल थकीत असल्याने विद्युत कंपनीने लूमचा वीजपुरवठा खंडित करून वीजमीटर काढून नेला. असे असले तरी अन्सारी याने लूमसाठी बेकायदेशीर विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेतला होता. दरम्यान, विद्युत कंपनीच्या भरारी पथकाने चौकशी केल्यानंतर लूमसाठी चोरून वीज जोडणी घेतल्याचे आढळले. मे 2003 ते 6 नोव्हेंबर 2003 या कालावधीत बेकायदेशीर विजेचा वापर करून 4800 युनिट वापरले त्याची रक्कम 1 लाख 44 हजार रुपये होती.

हेही वाचा -खरेदीच्या बहाण्याने इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी करणारी दुकली गजाआड

या कारवाईत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 30 मीटर विद्युत केबल देखील जप्त करून लूममालक अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपी अन्सारी याला 17 नोव्हेंबर 2003 ला अटक करण्यात आली. हे प्रकरण ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जाधव यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले असता सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि साक्षी यावरून आरोपी अन्सारी याला दोषी ठरविण्यात आले. वीज चोरीच्या या खटल्यात न्यायाधीशांनी लूममालक यांच्या विद्युत बिलाची थकबाकी 9 लाख 22 हजार असली तरी न्यायालयासमोर केवळ वीज चोरीचे प्रकरण आले आहे. तेव्हा विद्युत मीटर नसतानाही बेकायदा जोडणी घेऊन 1 लाख 44 हजाराची विद्युत वापरल्याने या प्रकरणात आरोपीला विद्युत कायदा कलम 135 नुसार तीन वर्ष तुरुंगवास किंवा वीज आकाराच्या तीनपट दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 5 लाखाचा दंड ठोठावत चोरून वापरलेल्या वीजेचे 1 लाख 44 हजार रुपये महावितरला देण्याचे निकालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details