महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात 14 बगळ्यांचा मृत्यू, नागरिकांत 'बर्ड फ्लू'ची भीती - bird flu in thane

राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लूने' थैमान घालत असतानाच ठाण्यातही तब्बल चौदा पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत. पक्षांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लू आहे, का हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

बगळ्यांचा मृत्यू
बगळ्यांचा मृत्यू

By

Published : Jan 7, 2021, 9:51 AM IST

ठाणे - राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लूने' थैमान घालत असतानाच ठाण्यातही तब्बल चौदा पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत. पक्षांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लू आहे, का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलातील मार्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मृत बगळे दिसले. पक्षांच्या मृत्यूमागे काहीतरी मोठे कारण असावे, या अनुषंगाने नागरिकांनी सर्व मृत बगळ्यांना एका जागी जमा केले.

ठाण्यात 14 बगळ्यांचा मृत्यू

महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पक्षांची पाहणी -

अधिकाऱ्यांकडून पक्षांची मृत पाहणी


पॉंड हेरॉन जातीचे 14 बगळे मृतावस्थेत आढळून आले. या जातीचे पक्षी साधारणतः पाणवठ्याच्या आसपास आढळून येतात व उंच झाडांवर घरटी बनवतात. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानात आणि हिमाचलप्रदेशात बर्ड फ्लूमुळे कावळे आणि बगळ्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

अधिकाऱ्यांकडून पक्षांची मृत पाहणी

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत पक्षी ताब्यात घेतले असून मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ठाणे पालिका उपायुक्त संदिप माळवी यांनी दिली.

नक्की कारण काय? तपास सुरू

काही वर्षापूर्वी ठाण्यातील वृंदावन भागात विष प्रयोगाने अनेक श्वानांना मारण्यात आले होते. त्यामुळे पक्षी मारण्यामागे असा काही प्रकार आहे का याचा तपास सुरू आहे.

बर्ड फ्लूची भीती -

पाच राज्यात बर्ड फ्लू हा आजार झाल्याने हजारो पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आता हा आजार महाराष्ट्रात आला आहे का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. या परिसरात नागरिकांकडून पक्षांना कोणत्या प्रकारचे अन्न दिले जाते, याचाही पक्षी प्रेमी शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details