महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील हवेचा दर्जा पुन्हा घसरला ; जाणून घ्या कोणत्या भागातील हवा आहे सर्वाधिक प्रदूषित - हवेचा दर्जा घसरला

Thane Air Pollution : मुंबई पाठोपाठ ठाण्यात हवेची गुणवत्ता खालावल्याचं दिसतंय. मागील काही दिवसात हवेच्या गुणवत्तेत अनेक वेळा चढ-उतार दिसून आले आहेत.

the air in thane deteriorated again
ठाण्यातील हवेचा दर्जा पुन्हा घसरला

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 8:15 AM IST

ठाणे Thane Air Pollution : शहराच्या प्रदूषणात वाढ झाल्याची माहिती उघडकीस आलीय. हवेच्या गुणवत्तेनं उच्चांक गाठला असल्याचं पालिकेच्या प्रदूषण विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. वर्षाच्या पहिल्या तीन दिवसातच हवेचा निर्देशांक दोनशेवर पोहोचलाय. दरम्यान, प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका पूर्णपणे फेल झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हवेची गुणवत्ता घसरली :मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली असून प्रदूषण वाढत आहे. त्यामुळं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेनं प्रदूषणाबाबत महत्वाची नियमावली तयार केली. तसंच त्याची अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली. यामध्ये नियम मोडणाऱ्यांविरोधात लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, जानेवारीच्या पहिल्या तीन दिवसातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम धोका आणि वाईट प्रकारात असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपमधून समोर आलंय.


उपवन परिसरातील हवा खराब : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि निसर्गरम्य परिसर असलेल्या उपवन परिसराची हवा अधिक प्रमाणात बिघडल्याचं आकडेवारीतून दिसून येतंय. 1 जानेवारीला - 246, 2 जानेवारी - 294, 3 जानेवारी - 272, 4 जानेवारी - 248 अशी हवेच्या गुणवत्तेची नोंद प्रदूषण विभागानं केली आहे. तर या भागात सर्वात जास्त बांधकाम सुरू असल्यानं हवा दूषित झाली असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय.


हवा सुधारण्यासाठी महापालिका स्तरावर पुन्हा प्रयत्न : नव्या वर्षात हवेच्या प्रदूषणाची परंपरा कायम असून ठाणे महापालिका हद्दीतील तीन हात नाका, घोडबंदर रोड तसंच उपवन परिसरात हवेची गुणवत्ता घसरलीय. त्यामुळं हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुन्हा एकदा महापालिका स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. बिघडलेल्या हवेमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दरम्यान, प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Air Quality Index : मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ; आजार बळवण्याची शक्यता, 'अशी' घ्या काळजी
  2. Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली; वायू प्रदूषणामुळं लहान मुलांना धोका? अशी घ्या काळजी
  3. Mumbai Air Pollution Issue: प्रदूषणापासून मुंबईला वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details