महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही सोडायचं नाही' - राष्ट्रवादी

देशात कुठेही संकट आले तर केमिस्ट असोसिएशन ही संघटना हजर असते. म्हणून 'संकटमोचक' असा या संस्थेचा उल्लेख शरद पवार यांनी भाषणात केला. तसेच राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही सोडायचा नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले.

mp sharad pawar
खासदार शरद पवार

By

Published : Feb 10, 2020, 1:16 AM IST

Updated : Feb 10, 2020, 6:00 AM IST

नवी मुंबई (ठाणे) - शहरात शनिवारीकेमिस्ट ब्लड बँकचे उद्घाटन खासदार शरद पवार आणि अन्न व औषध पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी शरद पवार यांनी देशात असणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रीवर आपल्या मिश्किल शैलीत ताशेरे ओढले. राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरचा सल्ला घेणे कधी सोडायचे नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

खासदार शरद पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया..

देशात कुठेही संकट आले तर केमिस्ट असोसिएशन ही संघटना हजर असते. म्हणून 'संकटमोचक' असा या संस्थेचा उल्लेख शरद पवार यांनी केला. तसेच राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरांचा सल्ला घेणे कधी सोडायचे नाही अशी मिश्कील प्रतिक्रियाही शरद पवारांनी दिली. त्याचप्रमाणे ऑनलाइन औषध देण्यासंबधी केंद्र व राज्य सरकारने विचार करावा, असेही पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'सीएए'मध्ये गैर काय, माझा देश म्हणजे धर्मशाळा नव्हे - राज ठाकरे

यावेळी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थीत होते. भुजबळ यांनी, सगळ्या दानात श्रेष्ठ दान हे रक्तदान व अवयवदान असल्याचे म्हटले. तसेच योग्य औषधे घेणे हे अंत्यत महत्वाचे आहे. कारण, योग्य औषध न घेतल्याचा परिणाम आपण स्वतः भोगला आहे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रात कोणत्याही लोकांना त्रास होऊ लागला, तर त्यावर शरद पवार हा एकच उपाय आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील बंगल्यात सर्व पक्षाचे लोक अनेक प्रश्नांची, समस्यांची उकल करण्यासाठी येतात. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट: अखेर 'त्या' वीरपत्नीला जमीन मिळणार, मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

तलवारी जुण्या झाल्या आता नविन शस्त्रे आली - भुजबळ

राज ठाकरे यांच्या मोर्चातील भाषणावर प्रतिक्रिया देताना भुबळ यांनी ; 'देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आणि आता फार नवनवीन शस्त्रे आली आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. तसेच एनआरसी, सीएएवर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये एनआरसी लागू करू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमची देखील स्पष्ट भूमिका हीच असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 10, 2020, 6:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details