ठाणे -ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात काल(मंगळवार) रात्री दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा विभागाच्यावतीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कोटपा-2003 कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
काल 5 ऑक्टोबर रोजी कोविड रुग्णालयात दारू, तंबाखू इत्यादी प्रतिबंधित वस्तू नेताना एका व्यक्तीस सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले. संबंधित व्यक्तीस उपआयुक्त केळकर यांच्यासमोर हजर करून सूचनेनुसार सदर व्यक्तीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.