महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आईपासून ताटातुट झालेल्या मुलाला शोधून काढण्यास पोलिसांना यश - हरवलेल्या मुलाची आईशी भेट

५ वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या कृष्णा सिंग या मुलाला शोधण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ५ वर्षापूर्वी झालेल्या क्षुल्लक कारणावरुन आईवर रागावून निघून गेल्याचे त्याने सांगितले.

५ वर्षापूर्वी आईपासून ताटातुट झालेल्या मुलाला शोधून काढण्यास पोलिसांना यश
५ वर्षापूर्वी आईपासून ताटातुट झालेल्या मुलाला शोधून काढण्यास पोलिसांना यश

By

Published : Mar 11, 2020, 9:24 PM IST

ठाणे - उल्हासनगरात आपल्या जन्मदात्या आईवर रागावून ५ वर्षापूर्वी घर सोडून निघून गेलेल्या त्या मुलाचा शोध घेण्यास उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिससांना यश आले आहे. कृष्णा सिंग (१९) असे या मुलाचे नाव आहे.

५ वर्षापूर्वी आईपासून ताटातुट झालेल्या मुलाला शोधून काढण्यास पोलिसांना यश

उल्हासनगरच्या कॅम्प नं.१ येथील कमला नेहरूनगर धोबीघाट परिसरात राहणाऱ्या सुनीतादेवी सिंग यांचा अल्पवयीन मुलगा कृष्णा ५ वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे असा अंदाज वर्तवत उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेल्या कृष्णाचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आदेश दिले होते. तसेच याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. दरम्यान स.पो.आयुक्त गुन्हे शोध १ व प्रतिबंधक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि गुन्हे शाखा उल्हासनगर हे गेल्या ५ वर्षांपासून कृष्णाचा शोध घेत होते. याप्रकरणी त्याचे नातेवाईक, आई, मित्र व बालसुधारगृह संस्था यांची बैठक घेऊन त्याचा शोध घेण्याविषयीची माहिती अदानप्रदान करण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखा घटक ४ चे व.पो.नि. महेश तरडे, पो.नि.मनोहर पाटील यांनी अपहृत मुलगा कृष्णा हा दिल्ली येथे असल्याची गुप्त माहिती मिळवली.

हेही वाचा -नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का, आणखी 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

स.पो.नि.श्रीमती झेंडे, पो.उप.नि.गणेश तोरगल, पो.ना.जगदीश कुलकर्णी, नवनाथ वाघमारे यांनी दिल्लीत असलेल्या कृष्णाला त्याच्या नातेवाईकांकर्वी सुत्रे हलवून उल्हासनगरात बोलावून घेत ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ५ वर्षापूर्वी तो आईवर रागावून निघून गेल्याचे त्याने सांगितले. घरातून पळ काढल्यानंतर सुरुवातीला ३ वर्ष तो भायखळा येथील भाजी मंडई येथे काम करून राहत होता. तानंतर तो मित्रांबरोबर गावी व तेथून दिल्ली येथे गेला. तिथे कामधंदा करून राहत होता. यामुळे क्षुल्लक कारणावरून मुलाची व आईची ५ वर्षापासून ताटातुट झाली होती.

पोलिसांनी कृष्णाला योग्य समुपदेशन करून त्याच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले. आपला बेपत्ता झालेला मुलगा पोलिसांमुळे ५ वर्षांनी मिळाल्याने सुनीतादेवी यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा -'तुम्ही कृतघ्न आहात..! शरद पवार तर स्वत: बाप झालेत'

ABOUT THE AUTHOR

...view details