ठाणे- तपासामध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या ठाणे नगर पोलिसांनी आज पुन्हा एकदा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली. रिक्षाचा अर्धवट नंबर व इतर कोणत्याही माहितीशिवाय तब्बल दहा दिवस कसून शोध घेत तक्रारदार महिलेचा मुद्देमाल मिळवून दिला आहे.
ठाण्यात अर्धवट गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी लावला दागिन्यांचा शोध - ठाणे पोलीस बातमी
आरती अवस्थी या गृहिणी हॅपी व्हेली येथील आपल्या घरून ठाण्यातील जिल्हा परिषद येथे रिक्षाने येत होत्या. प्रवासादरम्यान त्यांची पर्स गहाळ झाली. त्यात सोने, रोख रक्कम यासह महत्त्वाची कागदपत्रे होती.
हेही वाचा-अयोध्या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ओवैसी अडचणीत; बिहारमध्ये तक्रार दाखल
आरती अवस्थी या गृहिणी हॅपी व्हेली येथील आपल्या घरून ठाण्यातील जिल्हा परिषद येथे रिक्षाने येत होत्या. प्रवासादरम्यान त्यांची पर्स गहाळ झाली. त्यात चार तोळे सोन्याचे लॉकेट, चैन व 7 हजार 600 रुपये रोख, यासह आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, एटीएम कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्या रिक्षाला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सीसीटीव्हीत केवळ रिक्षाचा अर्धाच नंबर दिसत होता. ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या रिक्षाचा शोध घेण्यात आला. दहा दिवसांनी तो रिक्षावाला सापडला. त्याच्याकडून सर्वच्या सर्व माल पोलिसांनी ताब्यात घेतला.