महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान वाचले महिलेचे प्राण... व्हिडीओत थरार झाला कैद - ठाणे पोलीस बातमी

कळवा रेल्वे पुलावरुन खाली उतरून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक महिला उभी होती. प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी तिला वाचवले.

महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करताना पोलीस
महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करताना पोलीस

By

Published : Sep 16, 2020, 4:48 PM IST

ठाणे -अनेक जण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सतत प्रश्न उपस्थित करत असतात. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मंगळवारी (दि. 15 सप्टें.) एका महिलेचे जीव वाचले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करताना पोलीस

कळवा रेल्वे पुलावरुन खाडी उडी मारण्याच्या उद्देशाने एक अज्ञात महिला उभी होती. याबाबत पोलीस दलातील रवींद्र पवार व लिंगायत या दोघांना माहिती मिळाली. त्या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी धाव घेतली. ती महिला काही तरी विचार करत, त्या ठिकाणी थांबली होती. तेव्हा एका पोलिसाने तिला बोलण्यात गुंतवले. या दरम्यान एका पोलिसाने तिच्या नकळत पिलरवर उतरून तिला पकडले व सुरक्षितपणे मागे खेचले. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीसच आपले खरे रक्षणकर्ते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या घटनेची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत या दोन्ही पोलिसांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा -विशेष : ठाणे जिल्ह्यातील काही भागात 'ऑक्सिजन'चा तुटवडा, रुग्ण दगावण्याची संख्या वाढण्याची भीती

ABOUT THE AUTHOR

...view details