महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कीर्तनकाराचा मुलगा बलात्कारी; बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर करायचा अत्याचार - पोक्सो

नराधमाच्या वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने आईजवळ ही घटना सांगितली. आईने तत्काळ पीडित मुलीला घेऊन मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी नराधम संदीप विरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

कीर्तनकाराचा मुलगा बलात्कारी

By

Published : Aug 17, 2019, 8:22 PM IST

ठाणे- अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी एका गुंड प्रवृत्तीच्या नराधमाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा नराधम जिल्ह्यातील एका कीर्तनकाराचा मुलगा आहे. त्यामुळे ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. संदीप गोपीनाथ माळी (वय 41) असे बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नराधम संदीप हा पीडित अल्पवयीन मुलीवर जुलै 2015 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करत होता. यासाठी आरोपीने विविध ठिकाणाचा वापर केला. नराधमाच्या वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने आईजवळ ही घटना सांगितली. आईने तत्काळ पीडित मुलीला घेऊन मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी नराधम संदीप विरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.


खळबळजनक बाब म्हणजे नराधम संदीपचा भाऊ कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत सदस्य आहे. तर त्याची वहिनी प्रभाग क्रमांक 114 या प्रभागातून भाजपच्या नगरसेविका आहेत. नराधम संदिप विरोधात यापूर्वीही खंडणी, मारामारी, खून असे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, मानपाडा पोलिसांनी नराधम संदीपला आज दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details