महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Recruitment : पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणाऱ्या डमी परिक्षार्थीला अटक - विकास भवर सिंग जोनवाल

राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती विद्यालयात लेखी पोलीस भरतीची लेखी परिक्षा देणाऱ्या डमी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकास भवर सिंग जोनवाल असे आरोपीचे नाव असुन तो बाळाजी बाबू कुसळकर रा. प्रकाश आंबेडकर नगर, इमामपूर रोड बार्शी नाका, बीड यांच्या जागेवर परिक्षा देण्यासाठी आला होता.

Police Recruitment
Police Recruitment

By

Published : Apr 2, 2023, 7:32 PM IST

ठाणे :विद्यार्थी एक आणि परीक्षेचा पेपर लिहतो एक असा प्रकार ९० दशकात बोर्डाच्या परीक्षेत आढळत होते. मात्र ऑनलाईन पारदर्शक कारभार सुरु झाल्यानंतर या सर्व गोष्टींना आळा बसला. मात्र, त्या संपुष्टात आले नसल्याचा प्रत्यय रविवारी ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती राबोडी विद्यालयाच्या पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्र क्र ९ वर आला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार ईश्वर घोलवड यांच्या सतर्कतेमुळे डमी उमेदवार परीक्षा देताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेतलेला आरोपी विकास भवर सिंग जोनवाल हा बाळाजी बाबू कुसळकर चेस्ट क्रमांक 16892 रा. प्रकाश आंबेडकर नगर, इमामपूर रोड बार्शी नाका, बीड यांच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आल्याचे उघड झाले आहे.

डमी परिक्षार्थीचा पर्दाफाश : रविवारी(२ एप्रिल) रोजी राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती विद्यालय राबोडी हे पोलीस भरती करिता लेखी परीक्षेसाठी क्र ९ हे पेक्षा केंद्र होते. या केंद्रावर परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांची तपासणीत करण्यात आली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार ईश्वर घोलवड यांच्या सतर्कतेने पोलीस भरतीची परिक्षा देण्याऱ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दुसऱ्याच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या विकास भवर सिंग जोनवाल रा. बेंबळ्याची वाडी, पोस्ट कचनेर , तालुका जिल्हा संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्याकडे आक्षेपार्ह वस्तू तपासणीत आढळल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल : मुख्य दरवाजावर करण्यात आलेल्या तपासणीत संशयित विकास यांच्याकडे अनेक वस्तु आढळून आल्या. गुडघ्याच्या प्रोटेक्शन करिता असलेल्या नि कॅपच्या आत इलेक्ट्रॉनिक वॉच तसेच एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस ब्लूटूथ शी कनेक्टेड असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच कानात एक अतिसुक्ष्म ब्लूटूथ जे की निदर्शनास येणार नाही असे साहित्य घेऊन प्रवेश करण्याच्या खटाटोपात असतानाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन राबोडी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता विकास भवर सिंग जोनवाल हा डमी असून तो पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आला असल्याचे उघड झाले. मूळ प्रशिक्षणार्थी बाळाजी बाबू कुसळकर चेस्ट क्रमांक 16892 याच्या जागेवर तो बेकायदेशीर लेखी परीक्षा देण्यासाठी आल्याचे समोर आले. त्याला राबोडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - Sambhajinagar Riots Case : छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरण; आतापर्यंत 28 जण अटकेत, तर 50 जणांची ओळख पटली

ABOUT THE AUTHOR

...view details