ठाणे : कल्याण-शीळ मार्गवरील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली 'इगो' बारमध्ये उशिरापर्यंत छमछम (obscene dance of barbals) सुरू असल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी बाजारपेठ पोलिसांच्या विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पथकाने अचानक बारमध्ये धाड टाकली (Police raid on dance bar) असता, 'लैला ओ लैला' गाण्यावर बारबाला तोकडे कपडे घालून बिभत्स नृत्य करत असल्याचे आढळून आले. (Latest news from Thane) पोलिसांनी २६ बारबालांसह ग्राहक व हॉटेल चालकसह अश्या १८ जणांना ताब्यात घेऊन ५३ जणांवर (Crime against 53 people) मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Thane Crime)
Police Raid On Dance Bar : 'लैला ओ लैला' गाण्यावर बारबालेचे बिभत्स नृत्य सुरू असतानाच डान्सबारमध्ये पोलिसांची धाड - obscene dance of barbals
बारमध्ये २६ बारबाला लैला ओ लैला या गाण्यावर अश्लिल, (obscene dance of barbals) बिभत्स नृत्य बेभान होऊन ग्राहकांसमोर करत असल्याचे आढळून आले. हा प्रकार पाहताच बार बाहेर उभ्या असलेल्या पोलीस पथकाला धाड टाकण्यासाठी इशारा करून केला. (Thane Crime) पोलीस पथके ईगो बारच्या मुख्य प्रवेश दारासह पाठीमागील दारातून आत शिरून अचानक धाड (Police raid on dance bar) टाकली. (Latest news from Thane)
बारबालेचा अश्लील डान्स :कल्याण - शीळ मार्गावरील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुमारे ५० हून अधिक डान्सबार आहेत. त्यातच पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे याच मार्गावरील ईगो ऑर्केस्ट्रा बारमधील बारबाला ग्राहकांसमोर अश्लील, बिभत्स नृत्य करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रुपवते यांनी डान्सबारवर धाडीसाठी हवालदार अरुण आंधळे, संतोष शेडगे, रामदास फड यांचे पथक तयार केले. विशेष म्हणजे, इगो बार मानपाडा पोलिसांच्या हद्दीत येत असूनही सुरुवातीला मानपाडा पोलिसांना बारवर धाडसत्राची माहिती दिली नव्हती. मात्र ईगो बारवर धाड टाकण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक निघाल्यावर मानपाडा पोलिसांना रुणवाल सीटी गार्डन संकुलासमोर बोलावून घेण्यात आले.
पोलीस बनले बनावटी ग्राहक :बाजारपेठ पोलीस पथकातील दोन पोलीस कर्मचारी बनावट ग्राहक बनून इगो बारमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास इंट्री केली. त्यावेळी बारमध्ये २६ बारबाला लैला ओ लैला या गाण्यावर अश्लिल, बिभत्स नृत्य बेभान होऊन ग्राहकांसमोर करत असल्याचे आढळून आले. हा प्रकार पाहताच बार बाहेर उभ्या असलेल्या पोलीस पथकाला धाड टाकण्यासाठी इशारा करून केला. पोलीस पथके ईगो बारच्या मुख्य प्रवेश दारासह पाठीमागील दारातून आत शिरून अचानक धाड टाकली, धाडी दरम्यान बारमध्ये पंचनामा करुन ३० हजार रुपये किमतीचे डीजेसह ऑर्केस्ट्राचे साहित्य जप्त केले. दरम्यान, ईगो बार चालक शिवकुमार बिराजदार (३१), डीजेचा मालक विवेक सिंग यांच्यासह २६ बारबाला आणि १८ ग्राहकांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सावकार कोळी यांच्या तक्रारीवरुन ५६ जणांवर गुन्हा दाखल केला.