महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा मोर्चा; आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नोकर भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते आज मुंबईत जाऊन प्रदर्शन करणार आहेत. आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखून धरण्यासाठी मुंबईच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

police-protection-on-entry-of-mumbai
police-protection-on-entry-of-mumbai

By

Published : Dec 14, 2020, 8:17 AM IST

Updated : Dec 14, 2020, 10:05 AM IST

ठाणे-मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखून धरण्यासाठी मुंबईच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर बेरिकेड्स लावण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. नोकर भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते आज मुंबईत जाऊन प्रदर्शन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन..

राज्याच्या विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये. तसेच सारथी संस्था पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते आज मुंबईत जाऊन प्रदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातूनसुद्धा 100 हून अधिक चारचाकी गाडया निघाल्या असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

वाहतूकीवर परिणाम-

आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईच्या वेशीवर पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला दिसून येतोय. ठाण्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

लेखी आश्वासनाशिवाय परत येणार नाही..

आजच्या मुंबईतील मोर्चामध्ये राज्यभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जोपर्यंत नोकर भरतीची स्थगिती आणि सारथी संस्था सुरू करणार असल्याबाबतचे लेखी आश्वासन राज्य सरकार मार्फत आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे सचिन तोडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Last Updated : Dec 14, 2020, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details