महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासनगरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क करून पोलीस अधिकारी गणगे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. याच तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून काल गुरुवारी पोलीस अधिकारी गणगे यांना तक्रारदार कडून २० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस अधिकारी गणगे यांना अटक केली.

police officer arrested for taking bribe in ulhasnagar
उल्हासनगरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

By

Published : May 20, 2022, 2:45 PM IST

ठाणे - उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला २० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचुन रंगेहात पकडले आहे. धनंजय पंढरीनाथ गणगे (वय ३७ रा. बारावेगाव, कल्याण ) असे लाचप्रकरणी अटक पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

कंपनीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच -उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्यात हद्दीत तक्रारदार यांची कंपनी आहे. या कंपनीत काही दिवसापूर्वी एका कामगाराचा अपघात झाला होता. याच अपघाताच्या गुन्ह्याचा तपास लाचखोर गणगे यांच्याकडे होता. तपासा दरम्यान कंपनीतील कामगारांसाठी सुरक्षेची योग्य काळजी घेतली नसल्याचे कारण सांगून कंपनीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, लाचेच्या रक्कमेत तोडजोडअंती २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले.

लाचलुचपत अधिकाऱ्याच्या सापळ्यात अलगद अडकला - दरम्यान तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क करून पोलीस अधिकारी गणगे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. याच तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून काल गुरुवारी पोलीस अधिकारी गणगे यांना तक्रारदार कडून २० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस अधिकारी गणगे यांना अटक केली आहे. या गुन्हाचा अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details