ठाणे - बीएमडब्ल्यू कंपनीच्या महागड्या बाईकसह एका अल्पवयीन मुलाला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही बाइक चोरीची असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी अन्य एका आरोपीला अटक केली आहे. तर, त्यांचा साथीदार फरार आहे.
हे वाचलं का? - पुण्यात एकाच ठिकाणी सात दुकानांवर चोरट्यांचा डल्ला
कासारवडवली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घोडबंदर रोडवर रविवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी एक संशयास्पद मोटारसायकस्वार पोलिसांना दिसला. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तो १६ वर्षाचा असून कल्याणच्या आंबिवली भागात राहत असल्याचे समोर आले. बीएमडब्ल्यू कंपनीची असलेल्या या स्पोर्ट्स बाइकची किंमत ३ लाख ८० हजार रुपये आहे. त्याने साथीदारांच्या मदतीने बाईक चोरी केल्याचे समोर आली आहे. त्याचे अन्य दोन साथीदार असून तिघांची ही टोळी असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. यामध्ये १९ वर्षाच्या आणखीन एका युवकाला अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार आहे.
हे वाचलं का? -भंडाऱ्यात २ दुचाकी चोरट्यांना अटक;तीन लाखांचा मुद्देमाल जप्त