महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Two Thieves Arrested : बंद घरासह नशेसाठी मेडिकल फोडणारे दोन सराईतांना पोलिसांच्या बेड्या; २२ लाखांच्या मुद्देमालासह गजाआड - सरुद्दीन ताजुद्दीन शेख

रात्रीच्या वेळी बंद घराची तोडफोड करणाऱ्या सराईत चोराला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही आरोपी नशेसाठी मेडीकल फोडत होते. मेडिकल कॉलेजमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. सरोद्दीन ताजुद्दीन शेख (वय 32, रा. अमृतनगर मुंब्रा) आणि मोहम्मद जिलानी ईसा शाह (वय 40, रा. नागपाडा, मुंबई) अशी ढोपरीदार सराईत आरोपींची नावे आहेत.

Two Thieves Arrested
Two Thieves Arrested

By

Published : Mar 7, 2023, 10:51 PM IST

Updated : Mar 7, 2023, 11:00 PM IST

बंद घरासह नशेसाठी मेडिकल फोडणारे दोन सराईतांना पोलिसांच्या बेड्या

ठाणे :बंद घराची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खळबळजनक बाब म्हणजे हे सराईत चोरटे नशेसाठी चक्क मेडिकलमधील नशा आणणारे औषध लंपास करीत होते. ते चोरटे एका मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. सरुद्दीन ताजुद्दीन शेख ( वय ३२, रा. अमृतनगर, मुंब्रा), महम्मद जिलानी इसा शहा (४०, रा. नागपाडा, मुंबई) अशी बेड्या ठोकलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

रात्रीच्या घरफोड्यात वाढ : लॉकडाऊननंतर राज्य सरकराने कोरोनाची नियमावली रद्द केल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, घरफोड्या चोऱ्या खून दरोडे, फसवणूकसह अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कल्याण डोंबिवली शहरातही दिवसाढवळ्या घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहवयास मिळाले होते. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी गेल्याच आठवड्यात दिवसा घरफोडी करणारी सराईत चोरटे गजाआड केले होते. त्यापाठोपाठ रात्रीच्या घरफोड्या वाढल्याने पोलिसही या चोरट्याचा माग काढण्यासाठी कंबर कसली होती. त्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी मानपाडा पोलिसांना घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

फिल्मी स्टाईलने पाठलाग :त्यानुसार डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप, सुनील तारमळे, अविनाश वनवे, साहाय्यक उपनिरीक्षक सुरेश डांबरे यांच्या पथकाने घरफोडी, मेडिकल परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन चोरट्याची ओळख पटवली होती. त्यातच गेल्या महिन्यात रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप पोलीस पथकासह गस्तीवर होते. त्यावेळी उसरघर गावाजवळ त्यांना दोन जण दुचाकीवरुन मुंब्रा दिशेने जात असल्याचे दिसले. मात्र, त्यावेळी पोलिसांची व्हॅन आपल्या दिशेने येत असल्याचे समजताच दुचाकीवरील दोघांनी दुचाकी सोडून जवळच्या झाडीझुडपात पळ काढला होता. त्यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत झाडी झुडपात लपलेल्या चोरटे सरुद्दीन, महम्मद यांच्यावर झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात आणून त्यांची पोलीस पथकाने चौकशी केली असता, या दोघांनी मिळून मुंबई ठाणे, डोंबिवली परिसरात ३७ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

दोघांकडून २२ लाखांचा मुद्देमाल जप्त :अटक सराईत चोरटयांकडून ३५० ग्रॅम सोन्याचे दागिनेसह , ६२० ग्रॅम चांदी जप्त केली करून आतापर्यत या दोघांकडून २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. शिवाय डोंबिवलीत मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ घरफोडी तर, विष्णुनगर हद्दीत दोन ठिकाणी, तर ठाण्यातील नौपाडा हद्दीत एक चोरी केली आहे. शिवाय मुंबईतील ताडदेव, शीव, पायधुनी, व्ही. पी. रोड, नागपाडा अशा विविध २५ पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हे दाखल आहेत. या दोघांच्या अटकेमुळे अनेक महत्वाचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी व्यक्त केली.

MLA Anil Parab : रामदास कदम यांना योग्यवेळी उत्तर देणार - अनिल परब

Last Updated : Mar 7, 2023, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details