ठाणे - एका रिक्षा चालकाने प्रवाशाचे दीड लाख रुपये परत केले. सुरजकुमार अजय झा(वय-22) असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. मोठी रक्कम परत केल्याने या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक केले जात आहे. खारघर पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला.
मूळचे नांदेड येथील रहिवासी असलेले सुरेश पांडुरंग सांगळे हे तळोजा येथून खारघर दरम्यान रिक्षाने प्रवास करत होते. दरम्यान, ते त्यांची पिशवी रिक्षामध्ये विसरले. त्या पिशवीमध्ये दीड लाख रुपयांची रक्कम होती. सांगळे ज्या रिक्षात बसले होते, त्या रिक्षा चालकाने खारघर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्याकडे ती पिशवी जमा केली.