महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणुसकीचे दर्शन..भर पावसात पोलीस बुजवतात खड्डे, तर तरुणाई ढकलतेय बस गाड्या - ठाणे

रस्त्यात पडलेले खड्डे बुजवणे हे खरं तर महापालिकेचे काम आहे. परंतु, वाहनचालकांचा त्रास पाहता वाहतूक पोलिसांनीच हे खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. तर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाण्यातील पोलीस लाईनच्या तरुणांनी पावसात बंद पडलेल्या बसेसना ढकलत बाजूला काढले.

ठाणे

By

Published : Aug 4, 2019, 12:11 PM IST

ठाणे - शहर आणि उपनगराला वरुणराजाने चांगलेच झोडपून काढले असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणीच-पाणी झाले असून त्यातून वाट काढता काढता नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीने तर वाहनचालकांना अगदी जेरीस आणले आहे. परंतु, या सगळ्यात देखील जागोजागी माणुसकीचे दर्शन घडत आहे. रस्त्यात पडलेले खड्डे बुजवणे हे खरं तर महापालिकेचे काम आहे. परंतु, वाहनचालकांचा त्रास पाहता वाहतूक पोलिसांनीच हे खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे.

एकीकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता वाहतूक पोलीसच छोटे दगड आणि खडी टाकून सेंट्रल मैदानाजवळ पडलेले खड्डे बुजवत होते तर दुसरीकडे रस्त्यात बंद पडलेल्या बस ढकलताना काही तरुण दिसत होते. आज-काल तरुण मुलांना सामाजिक बांधिलकी राहिली नसल्याची ओरड नेहमीच ऐकू येते. परंतु, आज बंद पडलेल्या बसेस ढकलणारी ही तरुण मुले पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसत होता. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाण्यातील पोलीस लाईनच्या तरुणांनी पावसात बंद पडलेल्या बसेसना ढकलत बाजूला काढले.

ABOUT THE AUTHOR

...view details