महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायन-पनवेल मार्गावर अपघात.. रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसाचा मृत्यू

शीव-पनवेल महामार्गावरून आपल्या घरी परतणाऱ्या पोलीस हवालदाराचा अपघात झाला. यात ते जखमी झाले. पण, वेळेवर रुग्णवाहिका न पोहोचल्याने तसेच उपस्थितांनी मदत न केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस हवालदार सुधाकर बुवा
पोलीस हवालदार सुधाकर बुवा

By

Published : Feb 9, 2020, 12:38 PM IST

नवी मुंबई - येथील शीव-पनवेल महामार्गावर झालेल्या अपघातात एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उपस्थितांनी यावेळी बघ्यांची भूमिका घेतली होती. रुग्णवाहिका उशिरा आल्याने हा मृत्यू झाला आहे. शीव-पनवेल महामार्गावरील बेलापूर उड्डाणपुलापासून काही अंतरावर शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत असलेले सुधाकर बुवा ( वय 49 वर्षे) हे सीबीडी बेलापूर येथील शीव-पनवेल महामार्गावरुन पनवेल येथील त्यांच्या घरी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी अचानक त्यांची दुचाकी एका टॅम्पोखाली आली. मात्र, टेम्पोचालकाने गाडी काही अंतर टेम्पो तसाच पुढे नेले. त्यानंतर टॅम्पोचालक संतोषकुमार प्रेमचंद यादव (वय 38 वर्षे) याने गाडी थांबवत पळ काढला. पोलीस हवालदार सुधाकर बुवा हे बराच वेळ जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यांना रस्त्यावर कोणाचीही मदत मिळाली नाही.

महामार्गाने अनेक वाहने पुढे जात होती. मात्र, कोणीही थांबून सुधाकर बुवा यांना रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही. तसेच 108 क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिकाही उशिराने घटनास्थळी पोहोचली. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या घटनास्थळापासून काही मिनिटांच्या अंतरावरच वाहतूक पोलीस चौकी आहे. मात्र, तेथील पोलीसही वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाही. वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. मात्र, इतक्या गाड्यांपैकी एकही जण पुढे आला नाही. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा - Video: 'एटीएम'मध्ये हातचलाखी करत वृद्धांना लूटले

ABOUT THE AUTHOR

...view details