ठाणे - गोवा राज्यातून हलक्या प्रतिचे विदेशी मद्य महाराष्ट्रात आणून विक्री करणाऱ्या दारू माफियाच्या घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. कमी दरात मद्य आणून त्याची चढ्या भावात विक्री करण्यात येत होती. तसेच बनावट दारुही बनवण्यात येत होती. उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ३० लाखांच्या विदेशी बनावटीच्या मद्याचा साठा जप्त केला आहे.
ठाण्यात 30 लाखांचा विदेशी बनावटीचा मद्यसाठा जप्त - thane liquor
जगदीश लालचंद पाटील असे दारू माफियाचे नाव असून छापेमारी दरम्यान तो फरार झाला आहे. गोव्यात ९० रुपयांत मिळणारी विदेशी मद्याची बाटली ६०० रुपयांत विकत असल्याचे उघडकीस आले आहे.
जगदीश लालचंद पाटील असे दारू माफियाचे नाव असून छापेमारी दरम्यान तो फरार झाला आहे. गोव्यात ९० रुपयांत मिळणारी विदेशी मद्याची बाटली ६०० रुपयांत विकत असल्याचे उघडकीस आले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील बोहणोली गावातील एका शेतघरात विदेशी बनावटी दारूचा धंदा जगदीश पाटीलने सुरू केला होता. याची खबर राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक अशोक कांबळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांसह दिलीप काळे, राहुल पवार, बाळासाहेब गलांडे , संजय वाडेकर, दीपक कळंबे , विक्रम कुंभार या भरारी पथकाने छापा मारला. यावेळ ५ हजार ७०० विविध विदेशी कंपनीच्या मद्याच्या बाटल्या आणि वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल ५० हजार बाटल्यां ची झाकणे घटनास्थळावरुन जप्त केली,
या ठिकाणी विविध उचप्रतिच्या दारूच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाचा सखोलपणे तपास करून बनावट दारूच्या गोरखधंदाचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दीपक परब यांनी दिली.