महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Constable Turned Robber : ऑनलाइन गेमिंगमुळे हवालदार झाला कर्जबाजारी; लुटमार, फायरिंग अन् गेला तरुणाचा जीव - हवालदार झाला लुटारू

Constable Turned Robber : मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना ऑनलाइन गेमिंगमुळे (Indebtedness due to online gaming) हवालदार ६२ लाखांच्या कर्जात बुडाला. अखेर कर्ज फेडण्यासाठी त्याने लुटमारीचा मार्ग निवडला. दरम्यान, त्याने दोन तरुणांवर गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला. सूरज देवराम ढोकरे (वय ३७) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. तर अजीम अस्लम सय्यद (३०) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र फिरोज रफिक शेख (२७) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (constable shot dead)

Constable Turned Robber
आरोपीला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 8:07 PM IST

लुटमारी आणि खुनाच्या घटनेविषयी माहिती देताना ठाणे ग्रामीण पोलीस अधिकारी

ठाणे Constable Turned Robber :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील मैदे गावच्या हद्दीत दुचाकीवरून विरार पूर्व मधील चंदनसार, येथे राहणारे फिरोज आणि मृत अजीम हे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते. त्याच सुमाराला लुटपाटच्या उद्देशाने आरोपी हवालदाराने दोघांचा पाठलाग करत त्यांना निर्जन रस्त्यात अडवले. त्यानंतर धमकी देऊन अंगावरील दागिने हिसकावून घेत असतानाच, मृत अजीमने झटापटी केली. त्यामुळे आरोपी हवालदाराकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने त्याने दोघांवर गोळीबार केला. यामध्ये दोघेही दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपीने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीमध्ये बिघाड झाल्याने त्याने दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला.

लुटमारीचे उद्देश्य स्पष्ट झाले:दरम्यान या घटनेची माहिती पडघा पोलीस पथकाला मिळताच पथकाने घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करत पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. यानंतर गणेशपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस सुरेश मनोरे यांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगाने सूत्र फिरवली होती. तसेच पडघा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मुदगन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, कसारा पोलीस ठाण्याचे सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पडघा, कसारा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपासात दरोड्याच्या उद्देशाचा निष्कर्ष निघाला.

कर्ज फेडण्यासाठी बनला लुटारू:गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता हल्लेखोर अहमदनगर-नाशिक बसने पळून जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अहमदनगर पोलिसांच्या मदतीने बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका संशयितास शस्त्रासह शिर्डीतून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला ३७ वर्षीय सूरज देवराम ढोकरे असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ४८ तासांत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपी हवालदाराकडे अधिक चौकशी केली असता त्याने ऑनलाइन गेमिंगच्या नादात विविध बँक व पतपेढ्यांमधून ६२ लाखांचे कर्ज घेतले होते. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी आणि दरोड्याचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले.

आरोपीविरुद्ध हत्येचाही गुन्हा दाखल:१६ ऑक्टोबर रोजी जखमी अजीमचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पडघा पोलिसांनी अटक हवालदारावर हत्येचाही गुन्हा दाखल केला. गेल्या नऊ दिवसांपासून तो पोलीस कोठडीत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने त्यांनी दिली आहे. आरोपीने याआधीही आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पडघा पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

  1. Financial Fraud In Mumbai: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली उकळले ८० लाख
  2. Physical Abuse of Minors : अल्पवयीन दोन मुलांवर शौचालयात लैंगिक अत्याचार; नराधमाला बेड्या
  3. Call Girl Cheated : 74 वर्षीय आजोबांना 'कॉल गर्ल' ची भेट पडली 30 लाख रुपयांना

ABOUT THE AUTHOR

...view details