ठाणे -पोलीस आयुक्तालयातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 45 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. मूत्रपिंड निकामी झाल्याने महिन्याभरापासून त्या रजेवर होत्या. तर, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी कोरोना चाचणीच्या अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
ठाणे पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू - thane corona update
ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत महिला कॉन्स्टेबलवर मूत्रपिंड निकामी झाल्याने उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
covid19
राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 14 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1400 च्या जवळपास पोहोचली आहे. यात 142 पोलीस अधिकारी तर 1246 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून 428 पोलीस कर्मचारी कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई पोलीस खात्यात 650 पोलिसांना कोरोणाची बाधा झाली असून यात 191 पोलीस कर्मचारी बरे होऊन पुन्हा कामावर हजर झाले आहेत.