ठाणे -३१ डिसेंबर आले की ठाण्यातील येऊर भागाकडे सर्वांची पावले वळतात. परंतु, सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे आणि प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी टाळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सदर तारखेच्या चार दिवस आधीपासूनच येऊरच्या गेटवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. तसेच, येऊरच्या जंगलात नागरिक पार्टी करतात, त्यामुळे जंगलावरही पोलिसांची नजर आहे. जंगलात गस्त घातली जात आहे.
हेही वाचा -मीरा भाईंदरमध्ये युवक काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रम
जंगलाच्या आतमध्ये एकांतात पार्टी करणे तरुणींसाठी धोकादायक आहे. यामध्ये तरुणीचा विनयभंग होणे, किंवा तिच्याबरोबर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, जंगली प्राण्यांपासूनही तरुण मंडळींना जिवाचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणूनच आता पोलीस जंगलातही गस्त घालत आहे.